जुना मुंबई-पुणे रोड निगडी गावठाण येथे अंडरपास करा

0
313

पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : निगडी गावठाण येथील जुना मुंबई पुणे रोड येथे महापालिकेमार्फत 2008 साली कै. मधुकर पवळे उड्डाणपूल उभारण्यात आला. निगडी नाका येथे भक्ती-शक्ती उड्डाणपूल उभारण्याचे काम चालू आहे. या दरम्यान भुयारी मार्ग बांधण्याची मागणी विरोधी पक्षनेते राजु मिसाळ यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवकानी केली आहे.

मागे दोन ते तीन दिवसांपूर्वी भक्ती-शक्ती येथील उड्डाणपुलावरील मुंबई पुणे हायवे याचे उदघाटन करून चालू करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने जोरात ये-जा करत आहेत. मागेही याच रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना 3 लोकांचा अपघात झालेला आहे. यामध्येही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. कारण निगडी गावठाण मध्ये रस्त्याच्या बाजूला मोठी बाजारपेठ आहे. तीन शाळा अमृता नद मय मठ, विद्यानंद भवन शाळा, महानगरपालिकेची शाळा आहे. विद्यार्थ्यांचे व पालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते.

2012 पासून आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेकडे या सर्व गोष्टींची माहिती देत आहोत. या ठिकाणी भुयारी मार्ग करून द्यावा यासाठी मागणी करत आहोत. तरी याचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी, अशी या नगरसेवकानी केली आहे.

या कामासाठी आठ नगरसेवकांनी एकत्र येऊन मागणी केली आहे. जर काम केले नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, शैलजा मोरे, सुमनताई पवळे, अमित गावडे, शर्मिलाताई बाबर, उत्तम केंदळे, कमलताई घोलप,सचिन चिखले, राजेंद्र काळभोर, शंकर काळभोर, रोहिदास शिवणेकर, चंद्रकांत बाळा दाणवले, उत्तम ढाणे काका, ओमकार पवळे, पुदित शेमलीनी, उज्वला माळी यानी आयुक्त श्रावण हार्डीकर यांची भेट घेऊन त्या बाबत चर्चा केली.