जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीस्वारांनी लूटले

0
214

आंबेठाण, दि. 25 (पीसीबी) : रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर दुचाकी घातली आणि खाली पाडले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास आंबेठाण गावात दवणेवस्ती येथे घडली.

कृष्णा सुरेश चव्हाण (वय 23), कृष्णा गजानन वाशीमकर (वय 20, दोघे रा. खराबवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत संजय शामराव कुमारे (वय 18, रा. आंबेठाण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी दोन आरोपी मोपेड दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादी यांना दुचाकीची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.