“जिल्हा भगवा करू म्हणणारी शिवसेना पुण्यातून हद्दपार” – अमोल कोल्हे

832

पुणे, दि.१३ (पीसीबी) –पुणे जिल्हा भगवा करू, अशी भाषा शिवसेनेचे नेते करत होते. प्रत्यक्षात जिल्ह्य़ातून एकही जागा शिवसेनेला निवडून आणता आली नाही, याचं शिवसेना नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव यांना उद्देशून दिला आहे. मंचर येथे झालेल्या आमदारांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांच्या कृतज्ञता मेळाव्यात कोल्हे बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा करिष्मा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.शिरूर लोकसभेत राष्ट्रवादीचे पाच आमदार निवडून आले. त्याची रंगीत तालीम लोकसभा निवडणुकीतच झाली होती, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

शिरूर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघांमधील लोकसभेचे प्रलंबित प्रश्न पाचही आमदारांच्या सहकार्याने मार्गी लावू, अशी ग्वाही कोल्हे यांनी दिली आहे.