जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले करणार

0
313

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – राज्यातील जिल्हा परिषदेचे तलाव मासेमारीसाठी खुले केले जाणार असून यामुळे राज्यात ते लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

सुधारित ठेका धोरण २०१९ अन्वये मच्छीमार व मच्छीमारी सहकारी संस्था यांच्यासाठी ५०० हेक्टर पर्यंतचे तलाव/जलाशय मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र यामध्ये जिल्हा परिषदेच्या तलाव/जलाशयाचा समावेश नव्हता. तसेच ते तलाव ५०० हेक्टर पेक्षा कमी आहेत. राज्यात रोजगार निर्माण व्हावा आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे, म्हणून जिल्हा परिषदेचे तलाव/ जलाशय खुले केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, मत्स्यव्यवसाय व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.