Chinchwad

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत क्रांतिमित्र मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक

By PCB Author

January 13, 2019

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – किशोर गट ज़िल्हा स्तरीय कबड्डी  स्पर्धेमध्ये पिंपळे सौदागर येथील क्रांतिमित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल नगरसेविका निर्मलाताई कुटे व शत्रुघ्न काटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे पुणे ज़िल्हा कबड्डी असोसिएशन च्या वतीने किशोर गट ज़िल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यावेळी आंतराष्ट्रीय पंच दत्तात्रय झिंजुर्डे, मंडळाचे अध्यक्ष सुरज काटे  आदी उपस्थित होते. यशस्वी खेळाडूंना सुरज काटे यांचे  उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.