जितेंद्र आव्हाड यांना हायकोर्टाचा दिलासा

0
246

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : अभियंता अनंत करमुसे यांच्या कथीत आपहरण आणि मारहाण प्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी करमुसे यांनी हायकोर्टाकडे केली होती. ही मागणी कोर्टानं फेटाळून लावली, त्यामुळं आव्हाडांसाठी हा दिलासा आहे. न्या. पी. बी. वारले आणि न्या. ए. एम. मोडक यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला.

व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर असलेल्या अनंत करमुसे यांनी सन २०२० मध्ये सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्ते करमुसेंना आव्हाडांच्या घरी घेऊन गेले होते. यावेळी आव्हाडांनी कुरमुसेंना मारहाण केली होती. यानंतर वर्षभरानंतर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. पुढे ठाणे कोर्टानं आव्हाड यांची जामिनावर सुटका केली होती.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत व्हावा अशी मागणी याचिकाकर्ते कुरमुसे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. पण कोर्टानं त्यांची मागणी फेटाळून लावली.