जितेंद्र आव्हाडांची ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला धमकी, म्हणाले…..

0
599

मुंबई ,दि.२० (पीसीबी)- तान्हाजी चित्रपटातील चुकीच्या गोष्टी काढून त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा नाहीतर यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल, असा दम राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबात एक ट्विट केलं आहे.

शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे  यांच्या  पराक्रमाची कथा सांगणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला.मात्र या ट्रेलरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. त्यांनी ट्विटवरुन या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना थेट धमकीच दिली आहे.