‘जितना बड़ा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी’! – धनंजय मुंडे

0
732

बीड, दि. १७ (पीसीबी) – ‘जितना बड़ा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी’! असे म्हणत पंतप्रधान मोदी यांच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते व परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आव्हान दिले आहे.

पंतप्रधान मोदी यांची बीड जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी परळीत  आज (गुरूवार) जाहीर सभा आयोजित केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!  एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!

दरम्यान, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच काय भाजपने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जरी आणले, तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी  आव्हान दिले आहे.