जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी – नितीन गडकरी

0
363

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राजकीय घडामोडींना  वेग आला आहे. याबाबत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. तसेच आपली परखड मते व्यक्त केली आहेत. गडकरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.   

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची जाहीर केले. यावर गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी, अशी शक्यता  गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार, राज ठाकरे, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेले त्यांचे राजकारणापलीकडचे नाते अशा विविध विषयांवर  मनखुलास गप्पा मारल्या. नागपूरच्या जनतेने सेवेची संधी दिली, आजपर्यंत नागपूरचा विकास, भविष्यासाठी काम केले. मंत्री म्हणून पक्षाच्या पलिकडे जाऊन सर्वांना मदत करण्याचा  प्रयत्न केला, असे नितीन गडकरी म्हणाले.