जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून उद्योजक हणमंत गायकवाड यांची १६ कोटींची फसवणुक

0
481

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – जास्तीचा परतावा देतो असे सांगून बीव्हीजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक तथा उद्योजक हणमंत गायकवाड यांची तब्बल १६ कोटी ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २६ ते ३१ मार्च २०११ दरम्यान चिंचवड येथील बीव्हीजी हाऊसमध्ये झाला.

याप्रकरणी कंपनीचे संचालक हणमंत रामदास गायकवाड (वय ४६, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद रामचंद्र जाधव आणि सुवर्णा विनोद जाधव (दोघे रा. विमाननगर) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते ३१ मार्च २०११ या कालावधीत गायकवाड यांनी जाधव यांच्याकडे मेडिको कंपनीत गंतवणूक करण्याचे ठरवले. त्यानुसार जाधव यांच्या सावा मेडिको लिमिटेड, आनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, बायोडिल लेबोरिट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली, कंपनीने एक कोटी ५३ लाख ९५ हजार २२७ रुपयांचे समभाग दिले. मात्र आता पर्यंत कोणताच परतावा दिला नाही. यामुळे जाधव यांनी १६ कोटी ४५ लाख ४ हज़ार ३६६ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार गायकवाड यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहे.