जालिंदर बापू शिंदे यांच्या वतीने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप

0
1055

भोसरी,दि.१३(पीसीबी) – माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त माननीय जालिंदर बापू शिंदे (माजी नगरसेवक) यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी पवार साहेबांबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शरद पवार साहेबांनी महिलां विषयी जे निर्णय घेतले त्या निर्णयांचे अनेक महिलांनी कौतुक केले व आभार मानले.

यावेळी कार्यक्रमाला भोसरीतील जेष्ठ नागरिक व युवकांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये जालिंदर बापू शिंदे, आकाश पवार, तुकाराम भोपते पाटील, तुषार फुगे अड्. बागल साहेब, सयाजी देशमुख, नामदेव भोपते, जगन्नाथ मोहिते, टोपे काका, श्रीधर शिंदे हे सुरेश रामपुरे उद्योजक सचिन शेठ बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.