जालन्यात बनावट १९ हजार मास्कसह ७३० सॕनिटायझर जप्त

0
499

जालना, दि.२० (पीसीबी) – स्थानिक गुन्हे शाखा, महसूल विभाग, एफडीए यांनी संयुक्त कारवाई करत जालना शहरातील जुना मोंढ्यातील कल्पना एम्पोरीयम एजन्सीमधून १९ हजार मास्कसह ७३० सॕनिटायझर बॉटल असा ६ लाख रुपये किंमतीचा अवैध साठा जप्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून खबरदारी म्हणून मास्क, सॉनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. वाढती मागणी पाहता यावस्तूंचा तुटवडा जाणवू लागल्याने साठेबाजांवर कारवाई साठी प्रशासन सरसावले आहे. कल्पना एम्पोरीयम एजन्सीमध्ये सॕनिटायझर आणि मास्कचा अवैध साठा असल्याची माहिती खबर्यांकडून मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्रसिंग गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, सदर बाजार ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, महसूल पथक आणि अन्न व औषध प्रशासन, पुरवठा विभागाने सायंकाळी ५ वाजता धाड टाकली.
यावेळी मालक आनंद बंब यांना साठ्याबाबत विचारणा करण्यात आली असता शटर आणि रॕकच्या मधोमध करण्यात आलेल्या कप्यात ६ वेगवेगळ्या कंपनीच्या सॕनिटायझरच्या ७३० बॉटल आणि १९ हजार मास्क आढळून आल्या.
जप्त केलेले एकही सॕनिटायझर शासनाच्या कायद्यानुसार खरेदी केलेले नाहीत. लेबलही बंद व काही कंपन्यांचे आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांच्या मदतीने कारवाई केल्याचे अन्न औषधी प्रशासनाच्या मिटकर यांनी सांगितले .
हि कारवाई सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चालली.