जालन्याचा तिढा सुटला; खोतकरांनी माघार घेतल्याने रावसाहेब दानवेंचा मार्ग मोकळा

0
807

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – अखेर जालन्याच्या जागेचा तिढा सोडविण्यात युतीच्या नेत्यांना यश आले आहे.  शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून माघार घेतली आहे.  त्यामुळे भाजपकडून रावसाहेब दानवे यांचा  निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

युतीच्या औरंगाबादमधील मेळाव्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अर्जुन खोतकरांचे मतपरिर्वन करण्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना यश आले.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचा धर्म समजून सांगितला.  या धर्माप्रमाणे पहिली परीक्षा मी पास होईल. दुसरी परीक्षा तुमची आहे, तुम्हीही पास व्हा. आमच्या जिल्ह्यात आणीबाणी लागली होती, ती आज उठली, असे खोतकर यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाच्या विरोधात मी गेलो नाही. मी कडवट शिवसैनिक आहे, दगाफटका करणार नाही. दिलेली जबाबदारी पार पाडू, अशी ग्वाही खोतकर यांनी  यावेळी दिली.