जाब विचारण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यास मारहाण…

0
216

खेड, दि. ११ (पीसीबी) – सांडपाणी साफ करत असताना सावत्र दिराने महिलेला आणि तिच्या शेजारी राहणा-या महिलेला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ आणि त्याच्या पत्नीला सावत्र भावाने मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी पावणे पाच वाजता खेड तालुक्यातील पाईट येथे घडली.

 

नितीन शामसुंदर मंडलिक (वय 35, रा. पाईट, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम शामसुंदर मंडलिक (रा. पाईट, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेन्सपार्लर दुकान आहे. रविवारी सकाळी ते दुकानात गेल्यानंतर त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ‘घरासमोर आलेले सांडपाणी साफ करत असताना फिर्यादी यांचा सावत्रभाऊ आरोपी उत्तम याने मला व शेजारी राहणा-या सुभद्रा शेटे यांना शिवीगाळ व दमदाटी केली’ असे पत्नीने फिर्यादी यांना सांगितले.

त्याचा जाब विचारण्यासाठी रविवारी सायंकाळी फिर्यादी सावत्र भावाकडे गेले. त्यावेळी आरोपीने दगडाने फिर्यादी यांना मारले. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची पत्नी आली असता त्यांनाही लोखंडी पहारीने मारून जखमी केले. पोलीस हवालदार विठ्ठल रेंगडे तपास करीत आहेत.