जातीचा उल्लेख करणाऱ्या मोदींना गडकरीसाहेब, कुठे?, कधी? कुठल्या चौकात?’ फोडून काढणार?; राष्ट्रवादीचा खोचक सवाल   

0
642

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – जातीचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना गडकरी साहेब, कुठे?, कधी? कुठल्या चौकात?’ फोडून काढणार?  असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप नेते नितीन गडकरी यांना ट्विटरवरून केला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोलापूरमधील अकलूज येथील सभेमध्ये विरोधकांनी मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केल्याचा आरोप केला होता. या विधानाचा संदर्भ देत राष्ट्रवादीने गडकरी यांनी सवाल केला आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी  दोन महिन्यापूर्वी पिंपरी-चिंडवडमधील एका कार्यक्रमामध्ये  बोलताना  ‘जो जातीचे नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल, असे म्हटले होते. हाच धागा पकडून राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी काल जातीवर आपल्यावर टिका होत असल्याचे केलेले वक्तव्य आणि गडकरी यांचे जातीचे नाव काढणाऱ्यांना ठोकून काढण्याचे विधान बाजूबाजूला पोस्ट असलेला फोटो ट्विट केला आहे.