‘जागा विकून पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन’; आईला धमकी देत मारहाण करणा-या मुलांवर गुन्हा दाखल

0
297

देहूरोड, दि. ८ (पीसीबी) – ‘जागा विकून पैसे दे नाहीतर मी तुला मारून टाकीन’ अशी आईला धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 6) सकाळी देहूगाव येथे घडली.

अनुसया सुदाम मोरे (वय 65, रा. कंदपाटील नगर, देहूगाव) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कांतीलाल, आकाश (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांतीलाल आणि आकाश हे फिर्यादी यांची मुले आहेत. कांतीलाल याने फिर्यादी यांना ‘तू राहती जागा विकून मला पैसे दे. नाहीतर मी तुला मारून टाकीन’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादी यांनी जागा विकण्यास नकार दिला. त्यावरून आरोपी आकाश याने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांचा धाकटा मुलगा कैलास आला असता आरोपी कांतीलाल याने कैलास यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.