जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांचा सन्मान

0
417

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – आज जागतिक परिचारिका दिवस. या दिवसाचे औचित्य साधुन आपल्या कार्याचा कुठलाही दिखावा न करता जो वर्ग खरा कोविड योद्धा आहे अश्या खराळवाडी मधील प्राथमिक आरोग्यकेंद्र व लसीकरण केंद्रावरील सर्व नर्स व डॉक्टर भगिनींचा सन्मान पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ,खराळवाडी व आरंभ प्रतिष्ठान,गांधीनगर यांच्यातर्फे करण्यात आला.

प्रतिष्ठानच्या वतीने वैशाली मोहिते, भाग्यश्री नाळे, शेरली घोरपडे, अश्विनी पवळ, उर्मिला मैदाड यांचा गौरव पुष्पगुच्छ व भारतमातेची प्रतिमा देऊन करण्यात आला. यावेळी राजन गुंजाळ, विशाल पवळ, कासीम शेख, शिवा कांबळे, विजय नडविनकेरी, सोमेश चव्हाण, प्रदीप कलापुरे, कृष्णकांत कांबळे उपस्थित होते.