Pune Gramin

जांबे ग्रामपंचायतच्या वतीने गावात ४०० झाडांचे वृक्षारोपण

By PCB Author

July 07, 2018

जांबे, दि. ७ (पीसीबी) – राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे समर्थन करण्याच्या उद्देशाने जांबे ग्रामपंचायत व जांबे जिल्हा परिषद शाळेच्या संयुक्त विद्यमाने गावात ४०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच शीला मगर, ग्रामसेविका माधुरी खैरे, मुख्याध्यापिका सुलभा जाधवर, पर्यावरण समितीचे विलास गायकवाड, माजी उपसरपंच अनिल मगर, ग्रामपंचायत सदस्य योगीता मांदळे, रूपाली गायकवाड, सुजाता गायकवाड, रंजना गायकवाड, माजी उपसरपंच गणेश गायकवाड, विक्रम गायकवाड, संतोष गायकवाड यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायतीचे आजी-माजी सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

जांबे गावातील स्मशानभूमी परिसर, गावठाण, गायरान, शाळा इत्यादी परिसरात तसेच नेरे रस्त्याच्या दुतर्फा आंबा, फणस, बोन्साय, अशोका, कडुनिंब, गुलमोहर, वड, पिंपळ यांसह अन्य विविध पर्यावरण पूरक प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रासंचालन सुनिता जाधव यांनी केले. कैलास गवळी यांनी आभार मानले.