‘जस्लीनचे आणि माझे प्रेमप्रकरण हा तर बिग बॉसचा प्लान’; बिग बॉस स्क्रिप्टेड शो- अनुप जलोटा

0
997

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – बिग बॉस च्या १२ व्या सिझनमधून गायक अनुप जलोटा घराबाहेर गेले आहेत. जस्लीन मथारू आणि अनुप जलोटा यांच्या हॉट जोडीमुळे, त्यांच्या अफेअरमुळे बिग बॉसची चांगलीच चर्चा सुरूवातीला रंगली होती. भजन गायक अनुप जलोटा आणि त्यांची २८ वर्षांची गर्लफ्रेंड जस्लीन या दोघांची चांगलीच चर्चा झाली. आज अखेर अनुप जलोटा बिग बॉसच्या घराबाहेर गेले आहेत. बिग बॉस स्क्रिप्टेड असल्याचे अनुप जलोटा यांनी घराबाहेर आल्यावर सांगितले. एवढेच नाही तर जस्लीनसोबत माझे नाते बिग बॉसने प्लान केले होते असाही आरोप जलोटा यांनी केला आहे.

जस्लीनला शोची पहिल्यांदा ऑफर देण्यात आली. त्यानंतर जस्लीनने मला फोन केला आपण बिग बॉसमध्ये जाऊयात. तिच्या वडिलांनीही आम्हांला आग्रह केला. त्यांच्या आग्रहाखातरच मी या शोमध्ये सहभागी झालो. गुरू आणि शिष्य बनूनच या शोमध्ये जाऊ असे मी आणि जस्लीनने ठरवले होते.

तुम्ही जर गुरू आणि शिष्य म्हणून या शोमध्ये आलात तर हा शो चालणार नाही. त्यामुळे आम्ही सांगतो तेच मान्य करा. त्यांनी आम्हाला हेच सांगितले की तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहात हे तुम्ही जगाला सांगायचे आहे. त्यामुळे शोला टीआरपी मिळेल.

बिग बॉसतर्फे जे सांगण्यात आले ती बाब धक्कादायक होती. हा धक्का फक्त मलाच नाही तर जस्लीनच्या घरातल्यांनाही बसला. माझे मित्र आणि नातेवाईक हेदेखील ही गोष्ट ऐकून थक्क झाले. मी बिग बॉसच्या घरात असताना किती तरी वेळा ही गोष्ट सांगितली की जस्लीन माझी शिष्य आहे. सिक्रेट रुममध्ये असलेली नाराजी, आमचे भांडण हे सगळे बिग बॉसने सांगितल्या प्रमाणे स्क्रिप्टेड होते असाही आरोप जलोटा यांनी घराबाहेर आल्यावर केला आहे.