जसप्रीत बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सचिन तेंडुलकर

0
665

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – जसप्रीत बुमराह हा आजच्या घडीला जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो सध्या जितके उत्कृष्ट खेळतो आहे त्याहूनही उत्तम तो येत्या काळात खेळेल. त्याची सर्वोत्कृष्ट खेळी पाहायला अजून वेळ आहे असे विधान सचिन तेंडुलकरने केले आहे. आयपीएल १२च्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्स चेन्नईला हरवत विजेतेपद पटकावले असून जसप्रीत बुमराह या विजयाचा शिल्पकार ठरला आहे.

जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या १२व्या सीझनमध्ये १६ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ६.६३ इतकी असून त्याचे अत्यंत कौतुक केले जाते आहे. अंतिम सामन्यात मुंबईने १४९ धावा करून चेन्नईसमोर १५० धावांचाच लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात बुमराहने केवळ १४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. बुमराहने चेन्नईच्या धावांची घोडदौड रोखल्यामुळे अत्यंत चुरशीच्या सामन्यात चेन्नईचा केवळ एका धावेने पराभव झाला.

सामना संपल्यानंतर युवराज सिंहने सचिन तेंडुलकरची मुलाखत घेतली. त्यावेळी बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक करत तोच जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे सांगितले.