जसप्रित बुमराचे अर्धशतक

0
459

सिडनी दि.११ (पीसीबी) – भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा याने आज सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. पहिल्या कसोटीपूर्वी आज सुरू झालेल्या दिवस-रात्र सराव सामन्यात बुमराच्या खेळीचाच भारताला दिलासा मिळाला. बुमराचे कारकिर्दीमधील हे पहिले वहिले अर्धशतक ठरले.

प्रथम फलंदाजी करताना भारताचे दिग्गज फलंदाज एकामागून एक बाद झालेले असताना बुमरा आणि महंमद सिराज यांनी अखेरच्या विकेटसाठी केलेल्या ७१ धावांच्या भागीदारीमुळे भारताला किमान मजल मारणे शक्य झाले. बुमराने ५७ चेंडूंत नाबाद ५५ धावांची खेळी केली. बुमराने विल सदरलॅंडला षटकार ठोकत आपले अर्धशतक साजरे केले. त्याने आपल्या खेळीत सहा चौ आणि दोन षटकार लगावले. भारताचा पहिला डाव ४८.३ षटकांत १९४ धावांतच आटोपला.

कर्णधार विराट कोहलीने या सामन्यासाठी अपेक्षित विश्रांती घेतली. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल ही सलामीची जोडी अपयशी ठरली. पण, पृथ्वी आणि शभुमन गिल यांनी ६३ धा जोडताना भारताचा डाव सावरला. पण, आक्रमक खेळणारी ही जोडी नवव्या षटकात फुटली. सदरलॅंडने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर भारताचा डाव घसरला. फलंदाजांच्या अपयशामुळे भारताचा डाव २ बाद ७२ अशा स्थितीतून ९ बाद १२३ असा अडचणीत आला होता. अशा वेळी बुमरा आणि सिराज यांच्यात झालेल्या भागीदारीमुळे भारताला किमान धावसंख्या उभारता आली. ऑस्ट्रेलियाकडून शीन अबॉट आणि जॅक विल्डरमुथ यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. भारताकडून बुमरापूर्वी पृथ्वी शॉ (४०) आणि शुभमन (४३) यांनाच काय तो टिकाव धरता आला होता.