जळगावात मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा निर्घृण खून

0
445

जळगाव, दि. २५ (पीसीबी) – मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि.२४) मध्यरात्रीच्या सुमारास कासमवाडी परिसरात घडली.

शाम दीक्षित (वय अंदाजे ३५, रा. पंचमुखी हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आज सकाळी कासमवाडी परिसरात काही नागरिक फिरायला गेले होते. त्यांना शाम या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला. शामच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मारेकऱ्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.