जळगावात काँग्रेसच्या विजयामुळे कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

0
966

जळगाव, दि. १३ (पीसीबी) – मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा अनपेक्षित विजय झाल्यामुळे अत्यानंद होऊन  एका कार्यकर्त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावमधील पारोळा तालुक्यात घडली आहे. सुरेश ठाकरे असे काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव असून गेल्या ४० वर्षांपासून ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. यासोबत त्यांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्षपद देखील भुषवले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचा विजय मिळाल्यानंतर एका कार्यकर्त्याने सुरेश ठाकरे यांना फोन केला होता. विजय साजरा कऱण्यासाठी पारोळ्याला येण्यासाठी त्याने फोन केला होता. त्याच्याकडून निकालाची अधिक माहिती घेत असतानाच सुरेश ठाकरे यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.