जळगावातून शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेला होणार सुरवात

0
416

मुंबई, दि, १५ (पीसीबी) –शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. येत्या १८ जुलैला जळगाव येथून या जनाशिर्वाद यात्रा सुरवात करण्यात येणार असल्याचे युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई माध्यमांशी बोलतानी म्हंटले आहे.

लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मने जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार आहेत. शिवसेना – भाजप येत्या विधानसभा निवडणुकीला युतीकरत सामोरी जात आहे. युती असली तरी शिवसेना भाजपमध्ये काही अंतर्गत मतभेद असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला २०१४च्या विधानसभा निवडणुकीचा अनुभव असल्याने आता कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाची शिवसेनेची मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.

येत्या १८ जुलैला जळगाव येथून जन आशीर्वाद यात्रा सुरू होईल. त्यानंतर १९ तारखेला धुळे मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात तर २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डीत या जन आशिर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचे युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी म्हंटले.