Maharashtra

जलयुक्त शिवार योजनेत भष्ट्राचार, जलसंधारण मंत्र्यांनीच दिली कबुली

By PCB Author

June 24, 2019

मुंबई, दि, २४ (पीसीबी) – जलसंधारण मंत्री तान्हाजी सांवत यांनी जलयुक्त शिवार योजनेत भष्ट्राचार झाल्याची कबुली दिली आहे. राज्यातील दुष्काळ दूर करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार सारखी महत्वकांक्षी योजना राबण्यात आली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

राज्यामध्ये पुरंदर तालुक्यातील जलयुक्त शिवार कामात गैरव्यवहार झाला आहे, जलसंधारण विभागाने  देखील  हे  मान्य केले असून या प्रकरणाची एलसीबी मार्फत गुप्त चौकशी केल्याचे केल्याचे सावंत यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे. विशेष म्हणजे भ्रष्ट्राचार झालेल्या तालुक्याचे नेतृत्व शिवसेनेचेच जलसंपदा मंत्री विजय शिवतारे हे करतात.

दरम्यान, सर्व तक्रार करण्यात आलेली १३०० जलयुक्त शिवाराची कामे निवडण्यात आली आहे, अशा ठिकाणी जिल्ह्याबाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करुन विभागीय चौकशी सुरु करण्यात आल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.