जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे पथनाट्य स्पर्धा; ‘हे’ आहेत विषय

0
493

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) : ‘जलदिंडी प्रतिष्ठान’ तर्फे पवनामाई महोत्सवाच्या यंदाच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मी नदी बोलतेय’,’ ‘माझी नदी माझी जबाबदारी’, ‘पवनामाई आम्हाला माफ कर’ या विषयांवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन गटात ही स्पर्धा होणार असून पथनाट्याची चित्रफित 10 मिनिटांपर्यंत असावी. पथनाट्य पाठविण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2021 आहे.

जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पवनामाई महोत्सवाचे निमित्तसाधून पवना नदीवर जलदिंडीचे आयोजन केले आहे. जलदिंडी व पवनामाई उत्सवामुळे पवना नदी खो-यातील जनसमाज एकत्रित होतो. यावर्षी तपपूर्ती सोहळा असल्याने विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पथनाट्य स्पर्धेचेही नियोजन केले आहे. ‘मी नदी बोलतेय’,’ ‘माझी नदी माझी जबाबदारी’, ‘पवनामाई आम्हाला माफ कर’ या तीन विषयांवर पथनाट्य स्पर्धा घेण्यात येणार आहे.

शालेय गट 8 वी ते 10 वी, महाविद्यालय गट 11 वी ते 12 वी आणि शहरातील सामाजिक संस्था अशा 3 गटात ही स्पर्धा होणार आहे. शालेय, महाविद्यालयाकडून मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेले पत्रक किंवा सामाजिक संघटनेच्या अध्यक्षांची स्वाक्षरी असलेले पत्रक आणि संपर्कसाठी 2 फोन नंबर देणे आवश्यक आहे. पथनाट्याचे चित्रिकरण असलेली चित्रफित (व्हिडीओ) 9423237078, 8975765763, 7720005610 या व्हॉट्सअॅपवर पाठवावेत. चित्रफित 10 मिनिटांपर्यंत असावी आणि त्यापेक्षा जास्त वेळाची नसावी.

पथनाट्य चित्रफित मोबाईल केलेली पण चालेल. पथनाट्याची भाषा मराठी किंवा हिंदी असावी. पथनाट्य पाठविण्याची अंतिम तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. त्यानंतर आलेले चित्रफित ग्राह्य धरली जाणार नाही. पथनाट्य स्पर्धेचे निकाल 20 डिसेंबर रोजी करण्यात येतील. पथनाट्य चित्रफित जलदिंडी प्रतिष्ठान संस्थेच्या मालकीच्या राहतील. त्याच्या सादरीकरणाचा हक्क संपूर्णपणे प्रतिष्ठानचा राहील.