Pimpri

जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीतील झुलेलाल घाटावर महाआरती

By PCB Author

October 02, 2018

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने पिंपरीतील झुलेलाल घाटावर आज (मंगळवारी) महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संखेने महिला भाविकांनी गर्दी केली होती.

पिंपरीतील झुलेलाल घाटावर संध्याकाळी सहाच्या सुमारास हा उपक्रम पार पडला. यावेळी पवना नदीचे पूजन  करण्यात आले. जलदिंडी प्रतिष्ठानचे दशकपूर्तीच्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले असून नागरिकांचे नदीशी नाते जोडावे व नदीजवळ येऊन नदीच्या समस्या समजावून घेण्यात, असे आव्हाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.