Chinchwad

जर्मनी येथील कंपनीत पाठवलेले तब्बल ‘एवढ्या’ लाखोंचे चलन ई मेल हॅक बँक खात्यात वळवले

By PCB Author

December 29, 2020

चिंचवड, दि.29(पीसीबी) :  चिंचवड येथील फोर्ब्स मार्शल कंपनीतून जर्मनी येथील एका कंपनीला ई मेलद्वारे पाठवण्यात आलेले 50 लाख 27 हजार437 रुपये अज्ञातांनी ईमेल हॅक करून ते पैसे एका बँक खात्यात ट्रान्स्फर केले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत गणेश झेंडे (वय 57, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून जर्मनी येथील डायकॉम कंपनीला परकीय चलन 56 हजार 450 युरो (भारतीय चलनात 50 लाख 27 हजार 437) ईमेल द्वारे संपर्क करून पाठवण्यात आले. दरम्यान अज्ञातांनी जर्मनी येथील डायकॉम कंपनीचा ईमेल हॅक केला आणि फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून पाठवण्यात आलेले 50 लाख 27 हजार 437 रुपये अल्स्टर बँक आयर्लंड या बँकेच्या एका खात्यावर परस्पर ट्रान्स्फर केले. याबाबत अज्ञाताच्या विरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.