Maharashtra

जयदत्त क्षीरसागर आणि विखे यांना त्वरीत मंत्रिमंडळातून काढून टाका – पृथ्वीराज चव्हाण

By PCB Author

June 24, 2019

मुंबई, दि, २४ (पीसीबी) – भाजपमध्ये आताच प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद दिले आहेत. परंतू माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या मंत्रीपदावर आक्षेप घेत राज्यघटनेनुसार ते मंत्री होऊ शकत नाही अस विधान केले आहे.

याविषयी बोलताना, राज्यघटनेनुसार राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाऊन मंत्री होऊ शकत नाही. कारण त्यांना मिळालेले मंत्रीपद पक्षांतर व्याख्येचे उल्लंघन आहे, असे पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटले आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००३ साली त्यांनी केलेल्या घटनादुरुस्तीनुसार एखाद्या आमदार किंवा खासदाराने आपल्या पक्षाचा राजीनामा देऊन पक्षांतर केले, तर मंत्री होण्यासाठी त्याला पुन्हा निवडणूक लढवून आमदार किंवा खासदार होणे बंधनकारक असणार आहे, अस पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांच्याबाबतची सध्याची परिस्थिती घटनाविरोधी आहे. त्यामुळे या दोघांनाही त्वरीत मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.