Desh

जम्मू- काश्मीरमध्ये स्थानिक तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक; ६ नागरिकांचा मृत्यू

By PCB Author

December 15, 2018

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील चकमकीनंतर स्थानिक तरुणांनी सुरक्षा दलांवर केलेल्या दगडफेकीत ६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  यानंतर सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. तर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी सांगितले की, पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज ( शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम राबवली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरला.

या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद खंडित करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळी    सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या  रवाना केल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे सुरक्षा दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या हिंसाचारात एकूण १५ जण जखमी झाले आहेत.