Desh

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

By PCB Author

December 19, 2018

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून (बुधवार) राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.  राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केंद्राला अहवाल सादर केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. यावर आज राष्ट्रपतींनी राजवट लागू करण्याची घोषणा केली. 

यापूर्वी १९९० ते ऑक्टोबर १९९६ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपालांकडील सर्व आदेश संसदेकडे गेले आहेत. आता कायदा करण्याचे अधिकार संसदेकडे असतील. त्यानुसार राष्ट्रपती राजवटीत अर्थसंकल्पही संसदेतूनच संमत केला जाणार आहे.