Desh

जम्मूतील बस स्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला; १८ जण जखमी

By PCB Author

March 07, 2019

श्रीनगर, दि. ७ (पीसीबी) – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असताना आज (गुरूवार)  जम्मूतील  बस स्थानकाजवळ ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या स्फोटात १८ नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. गर्दीने गजबजलेल्या बस स्थानकावरच हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले.   संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.