“जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, उगीच गोरगरिब विदयार्थ्यांंना त्रास देऊ नका”

0
363

मुंबई, दि.२५ (पीसीबी) : आरोग्य विभागाची आज आणि उद्या (25 आणि 26 सप्टेंबर) होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. यानंतर विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपही आक्रमक झाला असून जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, उगीच गोरगरिब विदयार्थ्यांंना त्रास देऊ नका, असा निशाणा साधत विद्यार्थ्यांचं झालेलं आर्थिक नुकसान शासनाने भरुन द्यावं, अशी मागणी भाजप आमदार राम सातपुते यांनी केलं आहे.

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा रद्द झाल्याने एकच हल्लाकल्लोळ माजला आहे. विद्यार्थ्यांना संताप अनावर झालोय. कित्येक विदयार्थ्यांनी शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन परीक्षा केंद्र गाठलं होतं. पण रात्री 10 च्या दरम्यान अचानकपणे परीक्षा रद्द करण्याचा मेसेज विद्यार्थ्यांना देण्यात आला.

आज संपूर्ण महाराष्ट्रभर ही भरती परीक्षा होणार असल्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यार्थ्यांनी एसटी, रेल्वेने प्रवास करत परीक्षा केंद्रावरती पोहोचलेले आहेत परंतु आत्ता अचानकपणे परीक्षा रद्द झालीय असं सांगितलं गेलं. त्यामुळे हे कर्मदरिद्री निष्ठूर सरकार विद्यार्थ्यांच्या जीवावरती उठलेले आहेत. गरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मी या सरकारला इशारा देतो की जर या सरकार मधील लोकांना जर सरकार चालवता येत नसेल तर त्यांनी खुर्च्या उबवायचं काम करु नये. त्यांनी राजीनामा देऊन घरी बसा, अशा संतप्त भावना आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केल्या.

राज्यातील विद्यार्थ्यांचं वाटोळं करण्याचा ठेका ठाकरे सरकारने घेतलेला आहे. या सरकार मधील कोणी जाणते राजे वगैरे कोणी असतील त्या सगळ्यांचा मी निषेध करतो आणि सरकारमधल्या लोकांना लाज वाटत असेल तर त्यांनी हे सरकार स्वत:हून बरखास्त केलं पाहिजे, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केलाय.

अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा या परजिल्ह्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचले आहेत. तर काही विद्यार्थी अजूनही प्रवासात आहेत. शासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थी संताप व्यक्त करतायत. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात आज आणि उद्या (शनिवार आणि रविवार ता. 25 आणि 26 सप्टें) आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा राज्यात होत असताना काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र ही इतर राज्यांतील आली आहेत. “एका विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आलं आहे. त्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत परीक्षार्थींमध्ये एकच गोंधळ उडाला होता. ही समस्या केवळ एकाच विद्यार्थ्याला आली असून त्याचे हॉल तिकीट तात्काळ दुरुस्त केलं आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते. कुठल्याही परिक्षार्थींची गैरसोय होणार नाही अशा प्रकारे नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यानंतरही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.