Maharashtra

जनसेवाची पूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होताना दिसत नाही – ज्योतिरादित्य शिंदे

By PCB Author

March 11, 2020

मुंबई, दि.११ (पीसीबी) – काँग्रेस पक्ष पहिला जसा होता तसा आता राहिलेला नाही, अशा शब्दांत ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसवर निशाणा साधला. दिल्लीत त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला मान्यता मिळत नाही. काँग्रेसच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. जनसेवाची पूर्ती काँग्रेसच्या माध्यमातून होताना दिसत नाही. काँग्रेस वास्तवापासून दूर चालली आहे.