जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांचा ट्विटर विकत घेण्याचा मानस

0
286

वॉशिंग्टन, दि. १४ (पीसीबी) : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क हे सोशल मीडिया वरही राज्य करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी त्यांनी सर्वात मोठी मायक्रोब्लॉगिंग कंपनी ट्विटरला विकत घेण्याची ऑफर दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.रॉयटर्सच्या माहितीनुसार, अॅलन मस्क यांनी ट्विटरला विकत घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी ४१ बिलियन डॉलरची ऑफरही दिली आहे. ट्विटरच्या संचालक मंडळातील जागा नाकारल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी आता ट्विटर विकत घेण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दरम्यान, मस्क यांनी ४ एप्रिल रोजी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरमध्ये 9.2 टक्के हिस्सा विकत घेतला. यूएस एसईसी फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली होती. द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या माहितीनंतर ट्विटरच्या शेअर्स किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. Twitter Inc. ने त्यांच्या फाइलिंगमध्ये म्हटलं होतं की, अॅलन मस्क यांच्याकडे 73,486,938 इतके कॉमन स्टॉक आहेत. या अपडेटनं Twitter Inc चे शेअर्स 25.8 टक्क्यांनी वाढून 49.48 डॉलर प्री-मार्केट ट्रेडवर पोहोचलं होतं.