जगातल्या पहिल्या रोबो वृत्तनिवेदकाची चिनकडून निर्मिती

1220

चीन, दि. ९ (पीसीबी) – चीनने जगातील पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या वृत्तनिवेदकाची निर्मिती करून सगळ्यांनाच अचंबित केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता असलेल्या या वृत्तनिवेदकाची निर्मिती चीनची आघाडीची वृत्तसंस्था क्षिनुआ आणि चिनी सर्च इंजिन कंपनी सोगोऊ यांनी मिळून केली आहे.

या वृत्तनिवेदकाचे नाव झँग असे ठेवण्यात आले आहे. झँग इंग्रजी आणि मँडेरिन भाषेत बातम्या वाचू शकतो. झँगच्या पहिल्या बातमीपत्राचा व्हिडिओ क्षिनुआने प्रसिद्ध केला आहे. झँग माणसासारखे हावभाव आणि मानवी आवाजात बोलू शकतो. झँगची कार्यक्षमता ही माणसांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो जास्त वेळ काम करू शकतो. त्याच्यामुळे कामातल्या चुका कमी होतील आणि काम अधिक वेगाने होईल अशी प्रतिक्रिया क्षिनुआने व्यक्त केली आहे.