जगभरात रात्रभर ट्विटर डाऊन, यूजर्स वैतागले!

0
529

नवी दिल्ली, दि, १२ (पीसीबी) – इंटरनेटच्या महाजालातील सर्वात लोकप्रिय असलेले ट्विटर अकाउंट रात्रभर बंद होते. त्यामुळे जगभरातील ट्विटर यूजर्स रात्रभर वैतागले होते. ट्विट करता येत नव्हते आणि ट्विट येतही नसल्याने या यूजर्सना त्रास सहन करावा लागला. पहाटे ५-६च्या सुमारास ट्विटर सुरू झाल्याने यूजर्सना हायसे वाटले. दरम्यान, ट्विटर का ठप्प झाले?, याचे कारण कंपनीने अजूनही दिलेले नाही.

गुरुवारी रात्री ट्विटर ठप्प झाल्यावर रात्रभर यूजर्सनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ट्विटर कंपनीविरोधात संतापही व्यक्त केला. एवढंच नव्हे तर ट्विटर सुरू झाल्यानंतरही ट्विटरवरही यूजर्सनी ट्विटर का बंद झाले? याबाबतचे प्रश्न उपस्थित केले. या दरम्यान, काही यूजर्सनी तर ट्विटर बंद झाल्याचे मीम्सही व्हायरल केले.

दरम्यान, ट्विटर अकाउंट सुरू झाल्यानंतरही लोकांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने ट्विटर कंपनीनेही एक मजेशीर ट्विट करून यूजर्सना चिमटा काढला. ‘आम्हाला मिस केलंत का?’ असा मिश्किल प्रश्न ट्विटरने विचारला. त्यावर यूजर्सनेही फनी मीम्स व्हायरल करून ट्विटरला उत्तर दिले.