Desh

जगनमोहन रेड्डींनी शरद पवारांचा फोन घेणे टाळले

By PCB Author

May 21, 2019

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  आंध्र प्रदेशमधील वायएसआरसीपी पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. पण त्यांनी शरद पवारांचा फोन उचलणे टाळले.  रेड्डी यांच्या वायएसआसीपी पक्षाला काँग्रेसप्रणीत संपुआसोबत घेण्यासाठी  पवारांनी फोन केला होता. पण  त्यांनी हा फोन टाळल्याचे सांगितले जात आहे.

आंध्र प्रदेशला जो विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याच्यासोबत जाऊ , असे जगनमोहन रेड्डी यांनी आधी सांगितले होते. इंडिया टुडे -माय एक्सिस एक्झिट पोलनुसार वायएसआरसीपी पक्षाला लोकसभेच्या एकूण २५ जागांपैकी  १८ ते २० जागा मिळू शकतात. तर चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला ४  ते ६ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे कट्ट्रर  प्रतिस्पर्धी म्हणून जगनमोहन रेड्डी यांना ओळखले जाते.  मात्र अद्याप त्यांनी  आपली भूमिका जाहीर केलेली नाही. एनडीए सोबत आहेत की, यूपीएसोबत  याबाबत  जगनमोहन रेड्डी यांनी जाहीर केलेले नाही.  निवडणूक निकालानंतरच रेड्डी आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.