Chinchwad

जगताप डेरी येथे पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

By PCB Author

February 01, 2019

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडल्याने एका ३ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना जगताप डेअरी येथे घडली.

अरुण मनोज विश्र्वकर्मा (वय ३) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.२४ जानेवारी) रोजी अरुण हा जगताप डेरी परिसरात खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याच्या टाकीत पडला. घरच्यांनी त्याला तातडीने औंध रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.