Maharashtra

छोट्याला बंदूक चालवायला शिकवली, तोच मोठ्याचा गेम करून टोळी ताब्यात घेतो – जितेंद्र आव्हाड

By PCB Author

December 23, 2019

मुंबई,दि.२३(पीसीबी) – अंडरवर्ल्डचा जागतिक इतिहास पहा ना; ज्या छोट्याला बंदूक चालवायला शिकवली, तोच मोठ्याचा गेम करून टोळी ताब्यात घेतो, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून आव्हाडांनी गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यापाठोपाठ देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) राबवणार असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं होतं. मात्र, शहांच्या या भूमिकेला पंतप्रधान मोदी यांनी छेद दिला. राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत संसदेतच नव्हे, तर मंत्रिमंडळातही चर्चा झाली नसल्याचे मोदींनी म्हटलं. यावरुन आव्हाडांनी हा निशाणा साधला आहे.

अंडरवर्ल्डचा जागतिक इतिहास पहा ना; ज्या छोट्याला बंदूक चालवायला शिकवली, तोच मोठ्याचा गेम करून टोळी ताब्यात घेतो.#CAA_NRC_Protest #ShahVersusModi

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 23, 2019

एनआरसी देशभरात लागू करणार असं म्हणणाऱ्या अमित शहांच्या वक्तव्याशी विसंगत असं वक्तव्य मोदींनी केलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एकवाक्यता नाही काय, अशी शंका उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शिष्य एका दिवशी गुरुला बाजूला करुन स्वत:च गुरु होतो, असं आव्हाडांना सुचवायचं आहे.