छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

0
732

बीड, दि. २४ (पीसीबी) –  छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथून उघडकीस आली.

याप्रकरणी अमर तिडके आणि हनुमंत सावंत नावाच्या दोन तरुणांवर वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर आणि हनुमंत हे दोघेही अल्पवयीन मुलीला छेडत होते. या छेडछाडीला कंटाळून तिने आज विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अमर तिडके आणि हनुमंत सावंत या दोघांविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र दोघेही आरोपी फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.