छळ करत विवाहितेला मध्यरात्री काढले घराबाहेर…..आणि

0
888

शिवणे, दि.२५ (पीसीबी) : माहेरहून पैसे आणण्याची मागणी तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2019 ते 24 मार्च 2021 या कालावधीत शिवणे पुणे येथे घडला आहे.

पती प्रफुल्ल भिकाजी प्रताप (वय 30), सासू आणि नणंद (सर्व रा. शिवणे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 29 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. नवीन फ्लॅट घेण्यासाठी चुलत्याकडून पाच लाख रुपये आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. पैसे दिले नाही म्हणून आरोपींनी विवाहितेला मानसिक त्रास दिला. सतत टोमणे मारून बोलून विवाहितेला मध्यरात्री घराच्या बाहेर काढले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.