Notifications

छळ, अपमान आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांनाच नोटीस पाठवली जाते; तनुश्री दत्ताचा नाना पाटेकरांवर निशाणा

By PCB Author

October 04, 2018

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – छळ, अपमान आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांनाच भारतात नोटीस पाठवली जाते, अशा शब्दात अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मला धमकी देत आहेत, असा आरोपही तिने केला आहे.