Maharashtra

छत्रपतींनी छत्रपतीसारखे वागावे; रामराजे नाईक निंबाळकरांचा उदयनराजेंना टोला

By PCB Author

October 02, 2019

सातारा, दि. २ (पीसीबी) –  लोकांना काय आवडते, याकडे लक्ष देऊ नये. छत्रपतींनी छत्रपतीसारखे वागावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याची शैलीवर लगावला आहे.   

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की,  उदयनराजे भोसले यांनी माझा भाजपा प्रवेश थांबवला. मी त्यांच्या पक्षप्रवेशाविषयीही काही बोलू शकत नाही. त्यांनी माझा प्रवेश थांबवायला भाजप कोणाच्या सांगण्यावरून कोणाचा प्रवेश थांबवेल, असे मला वाटत नाही.

सातार जिल्ह्याला राजकीय संस्कृती आहे. उदयनराजेंविषयी मी काहीही बोलणार नाही. छत्रपतींनी छत्रपतींसारखे वागायला हवे. लोकांना काय आवडते, याकडे त्यांनी लक्ष द्यायला नको, असा टोला निंबाळकर यांनी लगावला.