छत्तीसगडध्ये काँग्रेस ४० तर भाजप ३० जागांवर आघाडीवर

0
540

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. हाती आलेल्या पहिल्या कलानुसार भाजपला  मोठा दणका बसण्याची चिन्हे  दिसू लागली आहेत. एकूण ९० जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस ४० तर भाजप ३० जागांवर आघाडीवर आहे.

गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसमोर काँग्रेसने येथे मोठे आव्हान उभे केले आहे. ‘चावलवाला बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री रमणसिंग यांनी लागोपाठ चौथ्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा  पणाला लावली होती. गेल्या वेळी भाजपला ४१ टक्के तर काँग्रेसला ४०.३ तर बसपला ४ टक्के मते मिळाली होती. मते काही प्रमाणात विरोधात गेली तरी भाजपला सत्ता कायम राखणे कठीण जाऊ शकते.