छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; ‘या’ नेत्याची मागणी

0
546

मुंबई,दि.३०(पीसीबी) – “अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ तसेच पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा समाजाच्या नेत्यांकूडन केली जात आहे. या मागणीचा आम्ही तीव्र स्वरुपात निषेध करतो,” असे म्हणत वेळ पडलीच तर त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरु अशी भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी घेतली. मंगळवारी (29 डिसेंबर) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत वडेट्टीवार आणि भुजबळ यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोध करताना शेंडगे यांनी वरील वक्तव्य केले. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी बोलताना, “मराठा समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी छगन भुजबळ आणी विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळाटून हकालपट्टी करावी अशी मगाणी राज्यपालांकडे केली. या मागणीचा आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो,” असे शेंडगे म्हणाले. तसेच छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार ओबीसी आणि मराठा समाजाची भूमिका मांडत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही संघर्ष करु असेही ते म्हणाले.