Maharashtra

छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी

By PCB Author

July 09, 2018

नागपूर, दि. ९ (पीसीबी) – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल ३ वर्षांनंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन भुजबळ यांनी सभागृहात जोरदार भाषण ठोकले. सत्ताधारी सरकारवर गंभीर आरोप केले. भुजबळांच्या आरोपांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. उभय नेत्यांना आवरण्यासाठी इतर मंत्री व आमदारांना धावून जावे लागले. नागपूर पूरस्थितीत नुकसान झालेल्यांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सर्व्हेक्षण सुरु असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. विरोधकांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, हिवाळी सोडून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या मागील उद्देश काय होता, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कोणतीही तयारी नसताना पावसाळी अधिवेशन नागपूरात घेतले. पावसाचा फटका बसून इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळाची वीज गूल झाल्याने कामकाज स्थगित करण्‍या आले होते. सरकारसह नागपूर महापाकिकेचे अपयश असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.