चोरी साठी त्यांनी तोडले चक्क सेफ्टी डोअर…

0
273

कासारसाई, दि. १८ (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी डोअर व दरवाज्याचे लॉक तोडून दोन लाख 11 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. 15) दुपारी बारा ते बुधवारी (दि. 16) सकाळी सहा या कालावधीत कासरसाई येथे घडली.

नीलम संदीप पन्हाळे (वय 37, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर मंगळवारी दुपारी बारा ते बुधवारी सकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे सेफ्टी डोअर व दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमधून दोन लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.