चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी खेड जेलमधून गज कापून पळाले

0
1613

खेड, दि. २२ (पीसीबी) – पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या राजगुरूनगर पोलिसांच्या कोठडीतून दोन सराईत गुन्हेगारांनी खिडकीचे गज कापून पलायन केले आहे. हा प्रकार आज (सोमवारी) पहाटे चारच्या सुमारास घडला.  

विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२, रा मंचर ता आंबेगाव जि. पुणे) आणि राहुल देवराम गोयेकर (वय २६, रा. गोयेकरवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी कोठडीतून पळालेले आरोपींची नावे आहेत. पोलीस कोठडीत असताना या दोन्ही आरोपींनी खिडकीचे गज कापून यातून पलायन केले.

दरम्यान, या दोघांविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी त्यांना खेड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास तळमजल्यावरच्या खिडकीचे गड या दोघांनी कापले आणि ते वाकवून पलायन केले. दरोड्यातील आरोपींना त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पळून जाण्यास मदत केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस कोठडीतून आरोपी पळून गेल्याने झोपलेल्या पोलीसांची आता झोप उडाली आहे. खेड पोलिस तपास करत आहेत.