चोरट्याना भेटली सुवर्णसंधी; कंपनीचे उघड्यावर ठेवलेले ‘एवढ्या’ लाखांचे साहित्य चोरीला

0
235

खेड, दि. १६ (पीसीबी) – खेड तालुक्यातील चिंबळी गाव येथे एका कंपनीचे साहित्य मोकळ्या जागेत ठेवले असताना अज्ञात चोरट्यांनी अडीच लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार 11 जुलै रोजी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजताच्या सुमारास घडला.

सुनील साहेबराव धामणे (वय 38, रा. इंद्रायणी कॉलनी, मोशी) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खेड तालुक्यातील चिंबळी येथे असलेल्या एका कंपनीत काम करतात. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीचे साहित्य उघड्यावर ठेवले होते. 11 जुलै रोजी रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मोकळ्या जागेतून दोन लाख 49 हजार 500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. त्यामध्ये सी ओ 2 वेल्डिंग टॉर्च, 2सी ओ टू मशीन, 3 फेज सप्लाय केबल, सी ओ 2 वेल्डिंग केबल, मशीन रेग्युलेटर, गॅस कटिंग टॉर्च, होस पाईप, एस एस ट्यूब असे साहित्य चोरून नेले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.